Monday , September 21 2026
Breaking News

सचिन पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला; हल्ल्याच्या निषेधार्थ शहापूर पोलिस स्थानकासमोर आंदोलन

Spread the love

बेळगाव : शहापूर परिसरातील रहिवासी सचिन रामचंद्र पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी, २५ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता शहापूर पोलीस ठाण्यासमोर दिव्यांग बांधवांनी एकत्र जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ७.११ वाजण्याच्या सुमारास सचिन पाटील यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप करण्यात येत असून, या घटनेमुळे दिव्यांगामध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

या प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सर्व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. अशोक बांदिवडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *