Monday , September 21 2026
Breaking News

बेवारस वृद्ध महिलेला अखेरचा आधार; सामाजिक बांधिलकीतून पार पडले अंत्यसंस्कार

Spread the love

 

बेळगाव : समाजात रक्ताच्या नात्यांपेक्षा माणुसकीचे नाते श्रेष्ठ असल्याचे दाखवून देणारी घटना बेळगावमध्ये घडली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झालेल्या एका बेवारस वृद्ध महिलेला पोलीस विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून सन्मानपूर्वक अंतिम निरोप देण्यात आला.

माहितीनुसार, वृद्ध महिलेचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ओळख पटण्याच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आला होता. मात्र दीर्घकाळ कोणतेही नातेवाईक समोर न आल्याने तिच्यावर सन्मानाने अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी सामाजिक स्तरावर प्रयत्न सुरू करण्यात आले.

माजी महापौर विजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एपीएमसी पोलीस ठाण्याच्या सहकार्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत मृतदेह सदाशिवनगर स्मशानभूमीत नेला. तेथे आवश्यक विधी पार पाडून वृद्ध महिलेला सन्मानपूर्वक अखेरचा निरोप देण्यात आला.

समाजातील दुर्लक्षित आणि बेवारस व्यक्तींनाही सन्मान मिळावा, या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *