बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक विश्वासराव नारायणराव धुराजी यांचा अमृत महोत्सव बुधवार दि. २९ मे रोजी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज) येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजिण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे हे असून माजी महापौर मालोजी अष्टेकर आणि चव्हाट गल्लीचे सरपंच प्रतापराव मोहिते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या स्वागत समितीत प्रवीण जाधव, उत्तम नाकाडी, चंद्रकांत कनबरकर, किसनराव रेडेकर, सुनील मेलगे, उदय किल्लेकर, ऍड. अमर येळ्ळूरकर, राजेश नाईक, शंकर किल्लेकर, विश्वजीत हसबे यांचा समावेश आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta