बेळगाव : १ जून १९८६ दिवशी बेळगाव येथे झालेल्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात शनिवार १ जून २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता श्रद्धांजली कार्यक्रम तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केला आहे. या कार्यक्रमास शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष श्री. दीपक दळवी, सरचिटणीस श्री. मालोजी अष्टेकर, खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta