शहरातील बहुचर्चित अशा “त्या” बँकेच्या अध्यक्षाचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची यादी संपता संपत नाही. “बेळगाव वार्ता”ने सातत्याने “त्या” बँकेचे गैरव्यवहार उघड केले असले तरी एक म्हण आहे “निर्लज्जम सदासुखी” या म्हणीला न्याय देण्याचे काम बँकेचा अध्यक्ष दिग्गुभाई आणि त्याचा पार्टनर बाळू यांनी केले आहे. “बेळगाव वार्ता”च्या हाती आलेल्या माहितीनुसार “त्या” बँकेमध्ये पदोन्नतीसाठी घोडेबाजार मांडलेला आहे.
सर्वसाधारणपणे आतापर्यंत “त्या” बँकेमध्ये ज्येष्ठतेच्या आधारावर पदोन्नती दिली जात होती. पण या पद्धतीला तिलांजली देण्याचे काम बँकेचे अध्यक्ष व त्याच्या साथीदाराने केले आहे. नैतिकता गमावून बसलेल्या “त्या” अध्यक्षाने सर्वच नियम धाब्यावर बसवले आहेत आणि स्वतःचा मनमानी कारभार सुरू केलेला आहे. स्वतःची जी हुजुरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीमध्ये अग्रक्रम दिले जात आहे.
कहर म्हणजे नुकताच बँकेमध्ये रुजू झालेल्या एका दीड शहाण्या कर्मचाऱ्याला पाच लाख रुपये घेऊन पदोन्नती विकण्याचा घाट या दिग्गु-बाळूच्या जोडीने घातला आहे. त्या कर्मचाऱ्याच्या वडिलांनी सुद्धा या बँकेमध्ये लाच देवून सुरक्षारक्षक पुरवण्याचे कंत्राट अनेक वर्षापासून मिळवले आहे आणि बँकेमध्ये वयस्कर, शरीराने थकलेले सुरक्षा रक्षक पुरवले आहेत. हा सगळा प्रकार बँकेचे इतर संचालक उघड्या डोळ्यांनी बघत असून सुद्धा या जोडगोळीने चालवलेल्या या नंगानाचावर “ब्र” काढण्यास तयार नाहीत. पण बँकेत काम करणारे मेहनती व प्रामाणिक कर्मचारी मात्र आता या सर्व प्रकाराला संतापून या विरोधात कायदेशीर पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. कोणत्या निकषांच्या आधारावर व कामाचा अनुभव बघून दिग्गुभाईनी पदोन्नतीची खैरात वाटली आहे?? यावर आता वातावरण तापू लागले आहे.
लक्ष्या- बाळ्या हटाव आणि मxxxठा बँक बचाव असे पोस्टर लावण्याच्या तयारीत ( क्रमशः)
Belgaum Varta Belgaum Varta