बेळगाव : 5 महिन्यात 3 वेळा निवेदन देऊन सुद्धा केवळ आश्वासन ऐकायला मिळतं आहेत. त्यामुळे येळ्ळूर येथील नागरिकांतून तीव्र संताप दिसून येत आहे.
शिवसेना चौक मेन रोडची गटार फार जुनी असून ती कोसळलेली आहे. ग्राम पंचायतीला ती गटार स्वच्छ करून पूर्ण बांधून द्यावी अशी मागणी करून 3 वेळा निवेदन दिलेलं आहे तरी काम होत नाही आहे त्या मुळे आम्ही जायच कुणाकडे असा प्रश्न जनतेला पडला आहे. त्या गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तेथील आजूबाजूचे लोक घरातील कचरा, घाण, पाणी त्या गटारीमध्ये टाकत आहेत. त्यामुळे तेथून येणाऱ्या जाणाऱ्या व तिथे बसणाऱ्या लोकांना त्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पंचायत सदस्यांना संपर्क साधला की आश्वासने आणि कारणे ऐकायला मिळतं आहेत. जर जनतेची काम पंचायत करत नसेल तर आम्ही जायचं कुणाकडे असा प्रश्न जनतेला पडला आहे. ऐन पावसळ्यामध्ये तेथे घाण मोठ्या प्रमाणात साचली आहे. तेथील लोक त्या गटारीमध्ये कचरा टाकत आहेत हे सर्व सांगून सुद्धा ग्राम पंचायत दुर्लक्ष करत आहे. मतदान आले की हात जोडून यायचं आणि नंतर 5 वर्षे जनतेला हात जोडायला लावायच अशी परिस्थिती येळ्ळूरमध्ये झाली आहे. वेळेत काम न होत असल्यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्येक वेळी ग्राम पंचायतीला निवेदन देऊन सुद्धा त्या निवेदनाची पंचायतकडून जाणीवपूर्वक दखल घेतली जात नाही. जर ही काम पंचायतने केली नाही तर आम्ही पुढील पाऊल उचलू असा इशारा तेथील नागरिकांनी दिला आहे.