Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगाव लोकसभा निवडणूक : मतमोजणीला सुरुवात

Spread the love

 

बेळगाव : मतमोजणीसाठी नुकताच सुरुवात झाली असून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्ते बंद करण्यात आले असून जवळपासच्या सर्व शाळा, महाविद्यालयांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आरपीडी महाविद्यालयात चालू आहे. सकाळी साडेसात वाजता स्ट्रॉंग रूम उघडण्यात आले असून मतमोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची कसून तपासणी करूनच त्यांना स्ट्रॉंग रूममध्ये सोडण्यात येत आहे. बेळगाव शहरासह देशवासीयांची उत्कंठा शिगेला लागली असून आपला खासदार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *