बेळगाव : लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आपली पकड मजबूत केली आहे. सुरवातीला आयात केलेला उमेदवार म्हणून शेट्टर यांना कार्यकर्त्यांसह मतदारांच्या नाराजीला सामोरे जावे लागले होते परंतु त्यांनी 1 लाख 77 हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळवला.
दरम्यान, ग्रामीण मतदार संघातील आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे वर्चस्व पाहता ग्रामीण मतदार संघातून मृणाल हेब्बाळकर यांना अधिकाधिक मताधिक्य मिळेल, अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत असतानाच ग्रामीण विधानसभा मतदार संघातून धक्कादायक मतांचा आकडा समोर आला आहे.
मतदार संघनिहाय आघाडी
रामदुर्ग – 402 काँग्रेस आघाडी
सौंदत्ती – 16951 काँग्रेस आघाडी
बैलहोंगल – 21397 भाजप आघाडी
गोकाक – 23897 भाजप आघाडी
बेळगाव दक्षिण – 73220 भाजप आघाडी
ग्रामीण – 47017 भाजप आघाडी
बेळगाव-उत्तर – 2401 भाजप आघाडी
अरभावी – 16006 भाजप आघाडी
जगदीश शेट्टर यांनी एकूण 1 लाख 77 हजाराने आघाडी घेतली.