बेळगाव : जागतिक रक्तदान दिनानिमित्त इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव आणि बेळगाव येथील जैन हेरिटेज स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान जनजागृती रॅली काढण्यात आली होती. दावणगेरे येथील ब्लडमॅन शिवकुमार म्हादिमाने हे या रॅलीचे विशेष आकर्षण होते. धर्मवीर संभाजी चौकातून धर्म. संभाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून पुढे किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली याठिकाणी पहिली रॅली तर आरपीडी क्रॉस ते गोगटे महाविद्यालय दुसरी रॅली अशा दोन विभागात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्व पटवून देत जनजागृती करण्यात आली. तसेच जैन हेरिटेज शाळेतील मुलांनी पथनाट्याद्वारे संदेश दिला. या रॅलीत जैन हेरिटेज शाळेतील १५२ विद्यार्थी त्यांच्या स्काऊट व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती पल्लवी नाडकर्णी, श्रीमती कल्पना नेवगिरे, मारुती यांच्यासमवेत शशिकांत सर, जिल्हा प्रमुख स्काउट आणि मार्गदर्शक बेळगाव विठ्ठा एस. बी. आणि अख्तर सर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मंजिरी पाटील, सचिव उर्मी शेरीगर, इव्हेंट चेअरमन अवंतिका रेवण्णावार, माजी अध्यक्ष सुचेता बागी, डॉ. सुषमा शेट्टी, पुष्पा देशपांडे, व्हीपी मेधा शहा, संध्या शेरीगर, संजना आचार्य, श्रुती कित्तूर, दीपिका पोरवाल, निश्चल पाटील, शलाका हिंगोराणी, शिल्पा मांगले आणि क्लबचे इतर सदस्य सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta