Wednesday , March 4 2026
Breaking News

“प्रेमासाठी वाट्टेल ते” आईमुळे तीन मुले वाऱ्यावर!

Spread the love

 

बेळगाव : एका आईने आपल्या मुलांना सोडून २५ वर्षीय तरुणासोबत पळ काढल्याची धक्कादायक घटना बेळगावच्या गणेशपूरमध्ये उघडकीस आली आहे. आईमुळे सध्या तीन मुले रस्त्यावर आली असून सध्या त्या तीन मुलांनी कॅम्प पोलिस स्थानकात न्याय मागण्यासाठी धाव घेतली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पतीच्या निधनानंतर सहानुभूतीच्या आधारे पतीच्या जागेवर पत्नीला नोकरी मिळाली. तीन मुले आईच्या आश्रयाखाली रहात होती. मात्र सदर महिलेचे २५ वर्षीय युवकाशी सूत जुळल्यामुळे ती महिला मुलांना सोडून तरुणाकडेच राहते. अनेकवेळा मुलांनी सदर तरुणाला सोडून आपल्या घरी परत येण्याची विनंती त्या महिलेकडे केली. मात्र त्या निर्दयी आईने तरूणाला सोडण्यास नकार दिला. आईच्या या वागण्याला कंटाळून तीनही मुलांना कॅम्प पोलिसांशी संपर्क साधला आणि आईला परत पाठविण्याची विनंती केली.
याबाबत आईला संपर्क साधला असता ही आमची वैयक्तिक बाब असल्याचे सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *