Sunday , July 26 2026
Breaking News

मक्कामध्ये उष्णतेची तीव्र लाट, उष्माघाताने २२ हज यात्रेकरूंचा मृत्यू

Spread the love

 

सौदी सरकार वादाच्या भोवऱ्यात

सौदी अरेबियामध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. यामुळे जगातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या धार्मिक यात्रांपैकी एक असलेल्या हज यात्रेवर परिणाम झाला आहे. हज यात्रेदरम्यान अति उष्णतेमुळे अनेक यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत उष्माघाताने २२ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहेत. मृतांची संख्या वाढल्यामुळे सौदी अरेबिया सरकार वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडले आहे. सध्या सौदी सरकारवर टीका केली जात आहे.

सौदी अरेबियामध्ये उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे मक्का आणि मदिना येथे आलेल्या जगभरातील २२ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तर उष्माघातामुळे हजारो यात्रेकरू आजारी पडले आहेत. सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, उष्माघाताच्या २७०० हून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. हज यात्रेदरम्यान उष्माघाताने मृत्यू झालेल्या यात्रेकरूंचे मृतदेह रस्त्याच्या कडेला उन्हात ठेवण्यात आल्याचे अनेक व्हिडीओ सौदी अरेबियातून समोर आले आहेत. या प्रकरणावरून आता सौदी अरेबिया सरकारवर टीका होत आहे. यावेळी भारतातून १ लाख ७५ हजार यात्रेकरू पवित्र हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *