बेळगाव : बेळगाव जिल्हा व प्रादेशिक वृत्तपत्र संपादक संघाच्या शिष्टमंडळाने आज बेळगावचे नूतन खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेतली.
संपादक असोसिएशनचे अध्यक्ष मुरुगेश शिवपूजी, उपाध्यक्ष हिरोजी मावरकर, सरचिटणीस संपतकुमार मुचलंबी, ज्येष्ठ संपादक एस.बी. धारवाडकर, मनोज कालकुंद्रीकर, राजेंद्र पोवार, शिव रायप्पा यळकोटी, कुंतीनाथ कलमणी, श्रीनिवास मावरकर, मतीन धारवाडकर आदी उपस्थित होते.
यावेळी नूतन खासदार जगदीश शेट्टर यांचा सत्कार करण्यात आला. संपादकांच्या समस्या ऐकून घेणारे खासदार जगदीश शेट्टर यांनी आगामी लोकसभा अधिवेशनात केंद्रीय माहिती मंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta