बेळगाव : कावळेवाडी येथील पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर याने दावणगिरी येथे नुकत्याच झालेल्या १७ वर्षे खालील कुस्ती स्पर्धेत ८० किलो वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्ण पदक पटकाविले. पुढील महिन्यात उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहे.
रवळनाथ हा बेळगुंदी बालवीर प्रशालेत दहावी वर्गात शिकत आहे.
सध्या तो मठपती कुस्ती आखाडा सावगाव येथे सराव करीत आहे.
मे महिन्यात हरियाणा येथे एक महिना अद्यावत प्रशिक्षण तो घेऊन आला आहे. कर्नाटक कुस्ती असोसिएशनतर्फे दावणगिरी येथे १७ जूनला या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. कुस्ती कोच रत्न कुमार मठपती व क्रीडा शिक्षक गोविंद गावडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
पै. रवळनाथची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta