बेळगाव : मराठा सेवा संघ बेळगावतर्फे शनिवार दिनांक १५-०६-२०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत सैनिक भवन येळ्ळूर येथे प्रसिध्द मांईंड ट्रेनर शिवश्री विनोद कुरडे (कोल्हापूर) (माईंड ट्रेनर व मोटिवेशनल स्पिकर) यांचे विद्यार्थी व पालकांसाठी माईंड पॉवर सेमिनार आयोजित केले होते. त्यावेळी महाराष्ट्र हायस्कुल येळ्ळूर, चांगळेश्वरी हायस्कुल येळ्ळूर, शिवाजी विद्यालय येळ्ळूर, भावकेश्वरी हायस्कुल सुळगे येळ्ळूर, नेताजी हायस्कुल सुळगे येळ्ळूर, येळ्ळूरवाडी शाळा येळ्ळूर, मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूरचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तसेच मराठा सेवा संघाचे सभासद शिवश्री आनंद काटकर, शिवश्री विवेक शिंदोळकर, शिवश्री दिपक कोले, शिवश्री यल्लाप्पा बिर्जे, शिवश्री गोपाळ शहापूरकर, शिवश्री प्रविण कदम, शिवश्री प्रकाश अनगोळकर, शिवमती काजल कंग्राळकरसह येळ्ळूर, सुळगा आणि बेळगांवचे सदस्य आणि अडकूर (महाराष्ट्र) येथून शिवश्री प्रकाश इंगवले आणि शिवश्री विष्णू कंग्राळकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात जिजाऊ पुजन व शिवपुजनाने झाली. शिवश्री अनिल हुंदरे यांनी सुत्रसंचालन केले. उपस्थित पाहुणे शिवश्री बबन कानशिडे, शिवश्री बाबुराव मुरकुटे, माईंड ट्रेनर शिवश्री विनोद कुरडे, शिवश्री भोगन सर, शिवश्री मोहन पाटील सर यांचे स्वागत व सत्कार शाल, श्रीफळ, ग्रंथ, पुष्प देऊन करण्यात आला. पाहुण्यांचा सत्कार मराठा सेवा संघ बेळगांवचे सभासद यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री किरण मा. धामणेकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकमध्ये त्यांनी मराठा सेवा संघ अखंड भारतातील मराठा बहुजन युवकांचे मन, मेंदू आणि मस्तक सशक्त करुन प्रत्येक युवकाला यशस्वी जिवनाचा कानमंत्र देत असून विद्यार्थ्यांनी कोणत्याही राजकीय पक्ष आणि राजकीय संघटनांचे मांडलिकत्व न स्वीकारता आपल संपूर्ण लक्ष आपल्या लक्षावर ठेवावे आणि सातत्यपूर्ण आभ्यास करुन आपल्या जिवनात यशस्वी व्हावे आणि आपल्या आईवडीलांचे स्वप्न पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर वरील शाळेमधील मुख्याध्यापकांनी आपले विचार व्यक्त केले. सैनिक सोसायटीचे चेअरमन यांनी आपले विचार व्यक्त केले. उपस्थित सत्कारमुर्तींचा सत्कार करण्यात आला. मराठा सेवा संघाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री प्रशांत कुट्रे यांनी मराठा सेवा संघासाठी नेसरी येथील १३५० चौरसफुटचा खुला प्लॉट मोफत दिल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, ग्रंथ आणि पुष्प देऊन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री किरण मा. धामणेकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शिवमती काजल धामणेकर, शिवश्री राजवीर बिर्जे, शिवमती आराध्या हलगेकर, शिवमती नम्रता कुंडेकर, शिवश्री आदित्य पाटील यांचा शाल, श्रीफळ, ग्रंथ, पुष्प देऊन शिवश्री बाबुराव मुरकुटे, शिवश्री प्रकाश अष्टेकर, शिवश्री बबन कानशिडे, शिवश्री अरुन धामणेकर, शिवश्री मोहन पाटील आणि प्रसिध्द माईंड ट्रेनर विनोद कुरडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठा सेवा संघाचे सचिव शिवश्री मनोहर घाडी यांनी मराठा सेवा संघाच्या कार्याबद्दल माहिती दिली आणि गेली ६ वर्षे मराठा सेवा संघ बेळगांव जिल्हा काय कार्य करत आहे याची माहिती त्यांनी दिली. प्रसिध्द माईंड ट्रेनर शिवश्री विनोद कुराडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. विद्यार्थांचा आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती कशी वाढवावी, विद्यार्थी स्टेजवर येण्यासाठी का घाबरतात, परिक्षेत भरघोस यश मिळविण्यासाठी ध्येयनिश्चिती कशी करावी याबद्दल त्यांनी सांगितले. मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष शिवश्री नारायण सांगावकर यांनी आभार व्यक्त केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.