बेळगाव : मुलाच्या वाढदिवसानिमित्त २०० जणांसाठी बिर्याणी ऑर्डर केलेली बिर्याणी वेळेत पोचली नसल्याने हाणामारी झाल्याची घटना गांधी नगर येथे घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, यमनापूर येथील सचिन दड्डी नामक व्यक्तीने आपल्या मुलाच्या वाढदिवसाचे आयोजन केले होते. त्यांनी गांधी नगर येथील सलीम नदाफ यांना २०० जणांना पुरेल अशी बिर्याणीची ऑर्डर दिली होती. रात्री ८ पर्यंत बिर्याणी देणार असे सांगितले होते पण रात्रीचे ११ वाजेपर्यंतही बिर्याणी दिली नसल्याने सचिन दड्डी यांनी आपले दोन मित्र अमृत गस्ती आणि बलराज हलबल यांना गांधी नगर येथे पाठवले. त्यावेळी बाचाबाची होऊन हाणामारी झाली यामध्ये मुस्ताक सय्यद आणि अफजल सय्यद हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
हाणामारी केल्याप्रकरणी माळमारुती पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.