बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कर्नाटक राज्य शाखेने बेळगावच्या डाॅ. राजश्री आर. अनगोळ यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल यंदाचा राज्यस्तरीय ‘आयएमए कर्नाटक राज्य शाखा डाॅक्टर्स डे पुरस्कार -2024’ जाहीर केला आहे.
बेंगलोर येथील बसव राजेंद्र ऑडिटोरियम, बीएमसी ॲल्युमनी असोसिएशन बिल्डिंग, बेंगलोर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॅम्पस के. आर. रोड बेंगलोर येथे येत्या सोमवार 1 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.या सोहळ्यात प्रमुख पाहुणे राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडुराव यांच्या हस्ते बेळगावच्या डॉ. राजश्री अनगोळ यांना ‘आयएमए -केएसबी डॉक्टर्स डे -2024’ पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. राजश्री अनगोळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta