Monday , September 21 2026
Breaking News

विद्याभारती जिल्हा शैक्षणिक संमेलन शनिवारी

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेलनाचे शनिवार ता. 29 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या शैक्षणिक संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून रामकृष्ण मिशन आश्रमचे स्वामी मोक्षातमानंदजी महाराज, राष्ट्रसेविका समितीच्या अलकाताई इनामदार, रामचंद्र एडके, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर, सचिव एस व्ही कुलकर्णी, विद्याभारती राज्यसमन्वयक सुजाता दप्तरदार, संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव उपस्थित राहणार आहेत या शैक्षणिक संमेलनला संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल गणेशपुर, संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल अनगोळ, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद हायस्कूल खानापूर, आणि हनीवेल हायस्कूल खानापूर, तसेच रामदुर्ग, गोकाक येथील विद्याभारती संलग्नित शाळेचे शिक्षक वर्ग उपस्थित राहणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *