बेळगाव (वार्ता) : शाहूनगर येथील समन्वय ब्लाईंड फौंडेशन संचालित अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी अनपेक्षितपणे विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजप ओबीसी युवा मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांचा वाढदिवस साजरा करून त्यांच्या सेवाभावी कार्याची पोचपावती दिली.
बुधवार दिनांक 12 जानेवारी हा राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा वाढदिवस. याच दिवशी सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव यांचाही वाढदिवस. हाच सुवर्णयोग साधून समन्वय ब्लाईंड फौंडेशन संचालित अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी किरण जाधव यांचा वाढदिन साजरा करून या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सेवाभावी कार्याची पोहोचपावती दिली.
याप्रसंगी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी, खानापूर भाजपचे संजय कुबल, कोचेरी यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी केली.
कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर किरण जाधव परतत असता विद्यार्थ्यांनी त्यांना थांबवून किरण जाधव यांच्या हस्ते केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरा केल्यानंतर उपस्थित मान्यवरांनीही किरण जाधव यांना शुभेच्छा देऊन दीर्घायुष्य चिंतिले आणि भविष्यात सर्वोच्च पदापर्यंत मजल मारून समाजहितासाठी अधिकाधिक कार्य घडो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
अनपेक्षितपणे पार पडलेल्या या कार्यक्रमाने किरण जाधव भारावले. सर्वसामान्य जनतेची सेवा करून आपल्यापरीने सामाजिक ऋण फेडण्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न असतील अशी ग्वाही यावेळी किरण जाधव यांनी दिली.
कार्यक्रमाला समन्वय ब्लाईंड फौंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
Check Also
आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट
Spread the love बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज …