Wednesday , December 17 2025
Breaking News

महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केली शहरातील स्वच्छतेची पाहणी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शहराला भेट देऊन सफाई कामगारांचे काम व स्वच्छतेचे निरीक्षण केले.
सकाळी 6.00 च्या सुमारास सदाशिवनगर येथील महापालिकेच्या वाहन शाखेला भेट दिली. नंतर त्यांनी कचरावाहू वाहनास भेट देऊन कामगारांच्या कामाची व स्वच्छतेची पाहणी केली.
त्यानंतर महांतेश नगर येथील बीट कार्यालय व वीरभद्रनगर बीट कार्यालयास भेट देऊन सफाई कामगारांची उपस्थिती तपासली व आरोग्य निरीक्षकांना निर्देश दिले. नंतर अशोक नगर जलतरण तलावाला भेट देऊन तिथली स्वच्छता व इतर कामे पाहण्याचे निर्देश संबंधितांना दिले, तसेच किल्ला तलावाला भेट देऊन दैनंदिन साफसफाईची कामे व परिसरातील स्वच्छ कामे पाहण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास दिल्या.
त्यांनी खडे बाजार व नरगुंदकर भावे चौक येथील भाजी मार्केटला भेट देऊन तेथील साफसफाईचे काम पाहिले व खराब झालेला रस्ता दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

About Belgaum Varta

Check Also

समाज सारथी सेवा संघाची येळ्ळूरमध्ये स्थापना

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर मधील समान विचार आणि ध्येय असलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *