Sunday , July 26 2026
Breaking News

बाची येथे घरावर झाड कोसळून नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

Spread the love

 

बेळगाव : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मंगळवारी रात्री विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली असून मोठे नुकसान झाले आहे. बेळगाव तालुक्यातील बाची येथील श्रीमती शांता परशराम गावडे आणि मोहन परशराम गावडे यांचा घरावर वृक्ष कोसळून 5 लाखाचे नुकसान झालेले आहे. तरी प्रशासनाने ताबडतोब या घडलेल्या घटनेकडे पाहून ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रदेशात आणि विविध तालुक्यात जोर दिसून आला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठी झाडे कोसळून घरांचे नुकसान झाले आहे तर रस्त्यावरील झाडे कोसळून वीज खांबे आणि यासह अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये रात्रीपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी नुकसान झाले असून सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. काही झाडे घरावरती पडून घरच्या खापऱ्या भिंती आणि पत्रे यासह मोडून लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. प्रशासनाने लक्ष घालून सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या समस्येतून सोडवून त्यांना न्याय द्यावा व नुकसान भरपाई देऊन सहकार्य करावे असे शेतकरी आणि जनतेतून मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *