बेळगाव : मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील ऐतिहासिक विहीर, काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली. हि विहीर अत्यंत जुनी असून चार घडघडे असणारी हि विहीर आजवर कधीच आटली नव्हती. संपूर्ण उन्हाळाभर या विहिरीतून पाणीपुरवठा व्हायचा. पण मुसळधार पावसामुळे अचानक हि विहीर कोसळली असून यामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना स्थानिक नागरिक सुनील मुतगेकर म्हणाले, हि विहीर ऐतिहासिक आहे. पावसामुळे हि विहीर कोसळली असून भविष्यात आजूबाजूच्या इमारतींना देखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेवकांना कळविण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींसह मनपानेही या समस्येकडे लक्ष पुरवून तोडगा काढण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta