Tuesday , September 17 2024
Breaking News

युवा समितीच्यावतीने निलजी, कोंडसकोप येथील सरकारी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निलजी येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळा, रणझुंजार मराठी प्राथमिक शाळा तसेच कोंडसकोप येथील सरकारी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली.
यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण युवा समिती उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले यांनी युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली तसेच मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज असून सीमाभागामध्ये मराठी भाषा आणि संस्कृती टिकवायची असेल तर मराठी शाळा जगल्या पाहिजेत आणि त्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये प्रवेश दिला पाहिजे असे सांगितले.
यावेळी युवा समिती उपाध्यक्ष वासू सामजी, पदाधिकारी किरण मोदगेकर, ग्राम पंचायत सदस्य रमेश मोदगेकर, विशाल म्हाळोजी, किरण शिंदोळकर, रोहित गोमाणाचे, परशराम नागरोळी, यश तारीहाळकर, युवराज मुतगेकर शाळा सुधारणा समिती सदस्य, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

दरम्यान, कोंडसकोप सरकारी प्राथमिक शाळा येथेही शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे उपाध्यक्ष वासू सामजी, तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे सरचिटणीस मनोहर संताजी, मुख्याध्यापक श्री. खन्नूकर, सहशिक्षक संजय चिगरे, ए. व्ही. ढगे, सहशिक्षिका श्रीमती कोकीतकर मॅडम आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *