Sunday , September 8 2024
Breaking News

केएलई हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी दोन यकृत प्रत्यारोपण यशस्वी

Spread the love

 

बेळगाव : एकाच दिवशी दोन यकृतांचे प्रत्यारोपण करून मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्यांचे प्राण वाचविण्याचा दुर्मिळ पराक्रम बेळगाव येथील केएलई संस्थेच्या डॉ प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्राने केला आहे.

अवयव प्रत्यारोपणात राज्याने पुन्हा एकदा कर्तृत्वाचे शिखर गाठले आहे. या प्रदेशात एकाच दिवशी दोन यकृत प्रत्यारोपणाची ही पहिलीच कामगिरी आहे. धारवाड येथील एसडीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्रीकांत नीलकांतप्पा उंबरजे (60) आणि सौन्दत्ती तालुक्यातील हिरेबुदनूर गावातील तरुण हे आपल्या गर्भवती पत्नीला घरी भेटण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रभाकर कोरे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनमंथा उद्दाप्पा सर्विध (21) यांचा ब्रेन डेड झाल्यानंतर त्यांचे अवयव दान करण्यात आले. जीवन-मरणाची लढाई लढणारे बागलकोट पोलीस कर्मचारी आणि मंगळूर येथील ६३ वर्षीय रुग्णाला यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. तरुणाने दान केलेल्या दोन किडनीपैकी एक किडनी केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात मुधोळ येथील रुग्णाला प्रत्यारोपण करण्यात आले, तर दुसरे हुबळी रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले. यकृत आणि किडनी प्रत्यारोपण झालेल्या तिघांची प्रकृती सुधारत असून काही दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असे डॉ. संतोष हजारे म्हणाले.

यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचे केएलईचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे व संचालक मंडळाचे सदस्य, रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. एम दयानंद यांनी अभिनंदन केले.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *