Sunday , July 26 2026
Breaking News

खानापूरकडे येणाऱ्या कारचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

Spread the love

 

हावेरी : बेळगाव जिल्ह्यातील शिगावजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळल्याने चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सुदीप कोटी (18) आणि निलप्पा मुलीमणी (23) यांचा जागीच मृत्यू झाला तर शिवनगौडा यल्लनगौडा (20) आणि कल्मेश मानोजी (26) यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत हे सावनूर तालुक्यातील बेविनहळ्ळी गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी सात वाजता बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नंदगडकडे सदर तरुण स्विफ्ट कारमधून येत होते. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कडुलिंबाच्या झाडावर आदळली.
अग्निशमन दलाचे जवान आणि शिगावी पोलिसांनी बचाव कार्य केले असून गंभीर जखमींना शिगावी तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याचाही उपचाराविना मृत्यू झाला.
सदर घटना शिगावी पोलीस ठाण्यात घडली आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *