Wednesday , December 10 2025
Breaking News

वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे आयोजित सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

Spread the love

 

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि गो साठे मराठी प्रबोधिनी बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी या गटासाठी निबंध लेखन स्पर्धा तर इयत्ता सातवी व इयत्ता दहावी या दोन वर्गांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांचे उद्घाटन ज्योती महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती मजुकर यांच्या हस्ते संपन्न झाले. ज्योती मजुकर यांनी आपल्या उद्घाटनपर मनोगतात सध्याच्या स्पर्धात्मक युगात व संगणक युगात मुलांनी अवांतर वाचन चौरस ज्ञान चांगल्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत स्वतःच्या क्षमता स्वतःचे कौशल्य व ज्ञान जितके मिळेल तितके ग्रहण केले पाहिजे असा मौलिक सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

अध्यक्षीय समारोपसाठी मराठी प्रबोधिनीचे सचिव श्री. सुभाष ओऊळकर यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रबोधिनीच्या सदस्या नीला आपटे तर आभार प्रदर्शन श्री. इंद्रजीत मोरे यांनी केले. इयत्ता पाचवी ते सातवी या प्राथमिक गटासाठी निबंध स्पर्धेत 80 मुलांनी सहभाग घेतला होता तर इयत्ता आठवी ते दहावीच्या निबंध स्पर्धेत 110 मुलांनी सहभाग घेतला होता. सातवीच्या सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी 150 मुलांनी सहभाग घेतला होता. तर इयत्ता दहावीच्या सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी 190 मुलांनी सहभाग घेतला होता. साठे प्रबोधिनीच्या या सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धेत बेळगाव भागातील बहुसंख्य शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. याबद्दल सर्व शाळांचे साठे प्रबोधिनीच्या वतीने व राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
इयत्ता सातवी सामान्य ज्ञान स्पर्धा निकाल
प्रथम क्रमांक आराध्या निलेश गावडे मराठी विद्यामंदिर देवरवाडी,
द्वितीय क्रमांक राजनंदिनी सुरेश कांबळे मराठी विद्यामंदिर देवरवाडी, तृतीय क्रमांक तृप्ती सनी भगत मराठी विद्यानिकेतन बेळगाव, चौथा क्रमांक गायत्री अरविंद पाटील बालिका आदर्श विद्यालय, उत्तेजनार्थ गायत्री सचिन पाटील न्यू इंग्लिश स्कूल मुद्गे, अथर्व महादेव पाटील मराठी विद्यानिकेतन, स्वाती संतोष पाटील बालिका आदर्श, गौतमी उत्तम खंडूकर मराठी विद्यानिकेतन, पल्लवी लक्ष्मण भोगण मराठी विद्यामंदिर देवरवाडी, मनस्वी यल्लाप्पा जायनाचे बालिका आदर्श विद्यालय.

इयत्ता दहावी सामान्य ज्ञान स्पर्धा निकाल
प्रथम क्रमांक प्रसाद बसवंत मोळेराखी मराठी विद्यानिकेतन, द्वितीय क्रमांक यश सदानंद गुगलट्टी मराठी विद्यानिकेतन, तृतीय क्रमांक संजना सागर पाटील जिजामाता हायस्कूल, उत्तेजनार्थ समर्थ बागेवाडी सेंट्रल हायस्कूल, सानिका पाटील मराठी विद्यानिकेतन, अक्षरा ती वाडकर भगतसिंग हायस्कूल आंबेवाडी, पुनम राजपूत जिजामाता हायस्कूल बेळगाव, शिवराज पाटील सेंट्रल हायस्कूल, साधना गुरुजी सरस्वती सरकारी हायस्कूल शहापूर, दीपा जाधव गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूल इदलहोंड.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *