बेळगाव : 2022 मध्ये बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान करण्यात आला होता त्याच्या निषेधार्थ बेळगावमधील शिवप्रेमींनी धर्मवीर संभाजी चौक येथे आंदोलन छेडले होते त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केल्याचा आरोप ठेवून बेळगाव पोलिसांनी रमाकांत कोंडुस्कर, शुभम शेळके, मदन बामणे, प्रकाश शिरोळकर, माजी महापौर सरिता पाटील, भरत मेणसे, नरेश निलजकर, अंकुश केसरकर, लोकेश रजपूत, हरीश मुतगेकर, विनायक कंग्राळकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर खटल्याची आज सोमवारी बेळगाव तृतीय जेएमएफसी न्यायालयासमोर तपास अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविण्यात आली.
सदर केस नं. 34/22 संदर्भात आज न्यायालयासमोर तपास अधिकाऱ्यांच्या साक्षीमुळे खटल्यातील सर्व साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सदर खटल्याची पुढील सुनावणी 26 जुलै रोजी होणार असून आरोपींच्यावतीने ऍड. श्यामसुंदर पत्तार आणि हेमराज बेंचन्नावर काम पहात आहेत.