Monday , December 8 2025
Breaking News

आषाढी एकादशी निमित्त सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. 8 येथे दिंडीचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : आज मंगळवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी निमित्त सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. 8 होसुर, बेळगाव येथे वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची मूल्ये जोपासावी व आपल्या संस्कृतीची ओळख, अध्यात्माची गोडी, संतांची शिकवण आणि भक्तिमार्गाची आवड निर्माण व्हावी यासाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

या दिंडीत वि‌द्यार्थी श्री विठ्ठल, रखुमाई, संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताई, संत तुकाराम, संत नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार, आधी संतांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थी अभंग, टाळ, मृदंगाच्या निनादात विठुरायाचा जयघोष करत होते, यामुळे दिंडी लक्षवेधी ठरली. ठीकठिकाणी दिंडीचे पाणी ओतून, आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. होसुर बसवाण गल्ली, मठ गल्ली, शहापूर कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली मार्गे शहापूर येथील विठ्ठल मंदिरात दिंडीची सांगता झाली. याप्रसंगी विद्यार्थिनी कु. धनश्री चौगुले, सार्थक अमरापुरकर, एस डी एम सी सदस्या श्रीमती मुक्ता चौगुले, धनश्री अवसरे यांनी अभंग सादर करून दिंडीची शोभा वाढविली.

हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती के. एस. गायकवाड, सहशिक्षक श्री. आर. एल. कोतेकर, श्री. एस. डी. पाखरे, श्रीमती एन. बी. गळगनाथ, श्रीमती एन. पी. देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर शाळा सुधारणा आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक वर्ग यांनी सहभागी होऊन मुलांना प्रोत्साहन दिले.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक दडपशाहीला जुगारून प्रशासकीय जागेत महामेळावा यशस्वी

Spread the love  बेळगाव : पहाटेपासून अटकसत्र सुरू करून महामेळावा उधळून लावण्याचे कर्नाटकी प्रयत्न हाणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *