Tuesday , March 3 2026
Breaking News

विविध ठिकाणी वृक्ष कोसळून विद्युत पुरवठा खंडित

Spread the love

 

बेळगाव : शहर परिसरात विविध ठिकाणी वृक्ष कोसळल्याने उत्तर विभागातील संपूर्ण विद्युत पुरवठा गुरुवारी सायंकाळी खंडित झाला होता. यामुळे संपूर्ण शहर अंधारात होते.

हिंडलग्याला जाणाऱ्या सेंट झेवियर्स रस्त्यावर पावसाने गुरुवारी सायंकाळी वृक्ष कोसळल्याने संपूर्ण उत्तर भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला तसेच मजगाव परिसरातही वृक्ष कोसळल्याने शहरातील विद्युत पुरवठ्यावर परिणाम झाला होता. सेंट झेवियर्स भागातून जाणारा रस्ता रहदारीसाठी काही वेळ बंद झाला होता.

शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी हॅस्कॉम विभागाच्या नोडल अधिकारी व पॉवर मॅन यांनी रात्री उशिरापर्यंत वृक्षांची तोड करून शहराच्या अर्ध्या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. तर कॅम्प, विजयनगर, गणेशपूर रोड, हिंडलगा, अशा इतर भागातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला नसून शुक्रवारी सकाळपर्यंत या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल, असे हॅस्कॉम विभागाचे कार्यनिर्वाह अभियंता मनोहर सुतार यांनी कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *