Sunday , September 20 2026
Breaking News

पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; जीप विहिरीत कोसळून 7 जणांचा मृत्यू

Spread the love

 

जालना : जालना – राजूर रोडवर तूपेवाडी फाट्याजवळ एका चारचाकी काळी पिवळ्या जीपचा भीषण अपघात झाला आहे. जीप विहिरीत कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला असून सहा जणांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मतदीने बाहेर काढण्यात आले आहेत. वारकरी पंढरपूरवरून घरी जात असताना हा अपघात झाला.
घटनास्थळी बचावकार्य सुरू असून काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जीपमध्ये नेमके किती जण होते, याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. घटनेची माहिती मिळताच जालन्यातील चंदनझिरा पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे आणि अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेत आहेत.

अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केलं त्यामुळे ६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे प्रशासनाने म्हटले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *