Wednesday , March 4 2026
Breaking News

मतिमंद मुलीवर अतिप्रसंग केलेल्या “त्या” नराधमाला फाशी द्या : कडोली येथील मुस्लिम समाजाची मागणी

Spread the love

 

बेळगाव : कडोली येथील मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुस्लीम समाजातील तरुणाला फाशी द्यावी, अशी मागणी कडोलीच्या समस्त मुस्लिम समाजाने केली आहे.

मतिमंद तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडोली येथील मुस्लीम बांधवांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. कडोली गावातील आझाद गल्ली येथील मतिमंद तरुणीवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी संपूर्ण कडोली गाव व मुस्लिम समाज निषेध करत आहे. मुस्लिम समाजातील आरोपी तरुणाला कठोर शिक्षा झाली पाहिजे. अत्याचारग्रस्त तरुणी आणि तिच्या कुटुंबियांसमवेत आम्ही खंबीर आहोत. या तरुणीची आणि तिच्या कुटुंबीयांची आम्ही समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने माफी मागत असल्याची प्रतिक्रिया माजी ग्रामपंचायत सदस्या हरिना तशिलदार यांनी व्यक्त केली. मुस्लिम समाजातील तरुणाने केलेले हे कृत्य निंदनीय आहे. संपूर्ण मुस्लिम समाज या घटनेचा निषेध करतो. अत्याचारग्रस्त तरुणी आणि तिच्या कुटुंबियांसमवेत आम्ही खंबीर असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व युवतीला न्याय मिळवून द्यावा, शक्य असल्यास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मुकसूद पठाण यांनी केली. यावेळी ख्वाजा बानेदार, फारुख तसीलदार, अल्ताफ तीगडी, जमीर पठाण आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *