बेळगाव : कन्नडिगांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज करवे प्रवीण शेट्टी ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी “कन्नडीगांचा स्वाभिमान दुखावणाऱ्या उद्योगपतींचा धिक्कार असो ” कन्नडिगांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटाच्या एका नेत्याने सांगितले की , राज्यातील नोकऱ्या इतर राज्यातील लोकांनी व्यापल्यामुळे बेरोजगारीची समस्या वाढली असून, सरकारने नोकरी आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. राज्य सरकारने नोकरीत आरक्षण द्यावे, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाध्यक्ष आर. अभिलाष, राजू गलगली, राजू कलपात्री, सूरज, गिरिजा आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta