Tuesday , March 3 2026
Breaking News

तलाठ्याच्या गाडीत सापडले १ कोटी दहा लाख रुपये..

Spread the love

 

बेळगाव : एक तलाठी आपल्या कारमध्ये 1 कोटी 10 लाख रुपये घेऊन जात असताना पोलिसांनी छापा टाकून कागदोपत्री नोंद नसलेली रक्कम जप्त केली.

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हलगट्टी चेकपोस्टजवळ पोलिसांनी ग्राम लेखापालाची गाडी अडवली असता त्यांना तलाठ्याच्या गाडीत रुपये सापडले व ते जप्त केले.

निपाणी तालुक्यातील ग्राम लेखापाल असलेल्या विठ्ठल ढवळेश्वर यांच्या गाडीत ही रक्कम आढळून आली सदर रक्कम बेळगावातून बागलकोटला नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. रामदुर्गचे डीवायएसपी एम. पांडुरंग यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

ही घटना रामदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून ही रक्कम कोणाची आहे याचा तपास अधिकारी करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *