बेळगाव : नुकत्याच झालेल्या सी. ए. परीक्षेमध्ये घवघवित यश संपादन केलेल्या संस्थेचे संस्थेचे सभासद ओमकार शाम सुतार यांचा नुकताच संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून ओमकार यांचे अभिनंदन केले. आपल्या जिज्ञासू वृत्तीमुळेच कु.ओमकार याने हे यश संपादन केले असेही नमूद करून भविष्यात यशस्वी होण्यासाठी संस्थेतर्फे कु. ओमकार याना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संजय चौगुले, शिवाजीराव अतिवाडकर व लक्ष्मीकांत जाधव यांनी भेट व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तर रामकुमार जोशी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सदर सत्कार समारंभाला कॅपिटल वनचे सर्व संचालक वर्ग, कर्मचारी वर्ग पिग्मी कलेक्टर व हितचिंतक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta