बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व हरित सेना बेळगाव समितीच्या वतीने बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य आंदोलन करण्यात आले.
आज शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कोडीहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी रद्द करावी, उसाची थकबाकी द्यावी, कृषी कायदा मागे घ्यावा, कळसा भांडुरी प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करावी यासह अनेक मागण्यांच्या पूर्ततेची मागणी करत आंदोलन केले.
Belgaum Varta Belgaum Varta