Tuesday , March 3 2026
Breaking News

जमिनीच्या वादातून एकमेकांवर हल्ला; दोघांचाही मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : जमिनीच्या वादातून दोघांनी एकमेकांवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना अथणी तालुक्यात घडली. हणमंत रामचंद्र खोत (३४) आणि खंडोबा तानाजी खोत (३२) यांचा मृत्यू झाला आहे. दोघेही अथणी तालुक्यातील खोतवाडी गावातील रहिवासी आहेत.
दोघांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता, गावातील वडिलधाऱ्यांनी दोघांमध्ये तडजोड करूनही काल रात्री दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन दोघांनी एकमेकांवर शस्त्रे घेऊन मारामारी केली. दोघेही जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचाराअभावी रात्री उशिरा दोघांचाही मृत्यू झाला. अथणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *