बेळगाव : बेळगावचे सुपत्र डॉ. दत्तात्रय ज्ञानदेव देसाई यांचा पहिला कविता संग्रह “दस्तक ….. अनसुनी आहट” याचे प्रकाशन हिंदी प्रचार सभा हैद्राबाद येथे करण्यात आले… यावेळी दक्षिण भारत हिन्दी प्रचार सभा आंध्रप्रदेश व तेलंगाणाचे अध्यक्ष श्री. पी. ओबय्या, सचिव श्रीमती ए. जानकी, कोषाध्यक्ष श्री. मुहम्मद खासीम, प्रबंध निधिपालक श्री. चवाकुल रामकृष्ण राव, प्रचार्य डॉ. सी. एन. मुगुटकर, पी. जी. विभागाध्यक्ष प्रो. संजय मादार उपस्थित होते. कवीवर डॉ. दत्तात्रय देसाई हे बेळगावमधील हुक्केरी तालुक्यातील बेळंकी या गावचे असून ते सध्या हैद्राबाद येथील दक्षिण भारत हिंदी प्रचार संघ अध्यापक विद्यालयामध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्प देवून डॉ. देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ. सी. एन. मुगुटकर यांनी “दस्तक… अनसुनी आहट” पुस्तकाचा प्रस्तावना परीचय दिला. अध्यक्ष श्री. पी. ओबय्या यांनी प्रकाशित कवितांची भरभरून स्तुती केली. सचिव श्रीमती ए. जानकी यांनी कविते मधिल महिलांचे स्थान, प्रेम आणि त्याग भावना विषयी चर्चा केली. प्रो. संजय मादार यांनी कविते मधील सामाजिक स्थिती, प्रेम आणि व्यंग वर आधारित कवितेंचा उल्लेख केला. पुस्तकाचे भुमिका लेखन वी.एन. हेगडे व डॉ. शशिकांत मिश्र यांनी केले. त्याबद्दल कवी डॉ. दत्तात्रय देसाई यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.