Sunday , September 8 2024
Breaking News

सौंदत्ती रेणुका यल्लमा मंदिर प्राधिकरणास मंजुरी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रेणुका यल्लमा मंदिराच्या विकासाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याबाबतच्या श्री रेणुका यल्लमा मंदिर विकास प्राधिकरण विधेयकाला मंजुरी देण्यात आली.
सौंदत्तीतील रेणुका मंदिराचा विकास करण्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे मंदिर विकासाच्या प्रतीक्षेत आहे. त्याकरिता धर्मादाय मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या अनुपस्थितीत कायदामंत्री एच. के. पाटील यांनी हे विधेयक मांडले. मंदिराच्या विकासासाठी आणि देखभालीसाठी कायदेशीर प्राधिकरणाची गरज आहे. त्याकरिता श्री रेणुका यल्लमा मंदिर विकास प्राधिकरण विधेयक अस्तित्वात आणण्यात येत आहे, त्यास मंजुरी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
धर्मादाय मंत्री, जिल्हा पालकमंत्री हे या प्राधिकरणाचे अनुक्रमे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील. खासदार, आमदार, बिगर सरकारी व्यक्ती, सरकारी अधिकारी या प्राधिकरणाचे सदस्य असतील. डोंगरावर असणाऱ्या या मंदिराचा एकूण परिसर ८८.३७ एकर आहे. या मंदिराचा विकास पर्यटन विकास मंडळ अधिनियम आणि प्राधिकरणाच्या सहकार्यातून केला जाणार आहे. भक्तांसाठी आणखी सुविधा उपलब्ध करण्याची योजना असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *