बेळगाव : बेळगावमधील गुरुदेव रानडे मंदिराचा शताब्दी महोत्सव १ ऑगस्टपासून सुरु होत असून या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती असेल अशी माहिती संघटनेचे एम. बी. जिरली यांनी दिली.
बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जमखंडी येथे जन्मलेले गुरुदेव गोविंद रानडे यांनी साहित्य विश्वात योगदान दिले पुण्यात जाऊन त्यांनी सुमारे तीस पुस्तके लिहिली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संतपरंपरेवर त्यांनी लिखाण केले. 1926 मध्ये, गुरुदेव रानडे यांनी पहिल्यांदा धर्मग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे डिजिटलायझेशन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिरली म्हणाले.तीन दिवस चालणाऱ्या शताब्दी सोहळ्यादरम्यान गुरुदेव रानडे यांच्या कन्नड ग्रंथावर आधारित अनेक कार्यक्रम आयोजिण्यात आल्याची माहिती एम. बी. जिरली यांनी दिली. 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योगपती विजय संकेश्वर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 3 ऑगस्ट रोजी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे प्रा. त्यागराज यांचे ‘शिक्षक ते गुरू प्रवास’ या विषयावर व्याख्यान होणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली.या पत्रकार परिषदेला अशोक पोतदार, प्रा. स्वाती जोग आदी उपस्थित होते.