Monday , September 21 2026
Breaking News

कणकुंबी एक्साईज नाक्याजवळ अवजड ट्रक कोसळला!

Spread the love

 

खानापूर : कणकुंबी एक्साईज नाक्याजवळ अवजड वाहतूक करणारी 12 टायरची ट्रक आज सोमवार दिनांक 29 जुलै रोजी सकाळी नाल्यात कोसळली. या मार्गावर अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेले असताना देखील या ट्रकला या मार्गाने कोणी सोडले असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे व सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. सदर ट्रकमध्ये फरशा भरलेल्या असून गाडी पलटी झाल्याने सगळ्या फरशांची मोडतोड झाली असून ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *