बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 7 नद्या दुथडी भरून वाहत असून जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोकाक तालुक्यातील संपूर्ण गाव पाण्याखाली गेले असून अनेक कुटूंबे रस्त्यावर आली आहेत.
घटप्रभा नदीला आलेल्या पुरामुळे गोकाक तालुक्यातील अनेक गावे बाधित झाली असून मेळवंकी गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. 800 घरे जलमय झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. 2019, 2021 मध्येही मेळवंकी गाव घटप्रभाच्या पुरात बुडाले होते. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली असून, गावातील इमारती, घरे, मंदिरे, शेतजमीन, रस्ते, पूल घटप्रभा नदीच्या पाण्याखाली गेले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta