बेळगाव : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि तत्त्वचिंतक डॉ. जे. पी. नाईक यांच्या जीवनपटाचा व कार्याचा आढावा घेणाऱ्या डॉ. एम. आर. निंबाळकर लिखित चरित्राचा प्रकाशन सोहळा सोमवार दिनांक २४ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
शिवबसव नगर येथील श्री सिद्धराम इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात सकाळी ११ वा. होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बेननस्मिथ हायस्कूलचे चेअरमन रेव्ह. जे. नंदकुमार भूषविणार आहेत. प्रमुख पाहूणे म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाचे उपकुलपती प्रा. डॉ. एम. रामचंद्र गौडा उपस्थित राहणार असून गदग येथील तोंटदराया संस्थान मठ, गदग येथील स्वामी श्री मनिरंजन जगदगुरु डॉ. तोंटदसिद्धराम महास्वामीजी यांच्याहस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
जयंत पांडुरंग नाईक यांनी शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत भरीव असे काम केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव आंतरराष्ट्रीय पातळीवर केला गेला. झोल्लो मोर्से या “शैक्षणिक क्षेत्रातील तत्वज्ञ” यांचे संपादक यांनी जगातील 100 शिक्षण महर्षी यांचा आढावा घेतला आणि युनेस्को या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात काम केलेल्या जागतिक स्तरावरील कालातीत अशा शंभर जणांची यादी प्रसिध्द केली. त्यात भारतातून महात्मा गांधी आणि रविंद्रनाथ टागोर यांच्या व्यतिरिक्त डॉक्टर जे. पी. नाईक यांचेच नांव होते डॉ. जे. पी. नाईक यांच्या कार्याची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी म्हणून डॉ. मनोहर रा. निंबाळकर यांनी हे पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिले आहे.
डॉ. मारुतीराव उर्फ मनोहर निंबाळकर हे चिक्कोडी तालुक्यातील सिध्दापुर वाडी गावचे असून त्यांनी विविध पदावर कार्य केले आहे आणि महाराष्ट्रातील काही शिक्षण संस्थांच्या कार्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. डॉ. मनोहर निंबाळकर यांनी लिहिलेल्या यापुस्तकाला आंतरराष्ट्रीय किर्तीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथराव माशेलकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. सदर पुस्तक राजहंस पुस्तक प्रकाशक कोल्हापूर यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास शिक्षणप्रेमीनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. एम. आर. निंबाळकर यांनी केले आहे.
Check Also
१९२४च्या काँग्रेस अधिवेशनामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले : प्राचार्य आनंद मेणसे
Spread the love बेळगाव अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण निमित्त अंनिसतर्फे विशेष व्याख्यान बेळगाव : हिंदू …