Tuesday , July 14 2026
Breaking News

कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीकडून कचरापेटीचे वाटप

Spread the love

बेळगाव (वार्ता) : कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतकडून गावातील नागरिकांना कचरापेटीचे वाटप करण्यात आले. ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत चालू असलेल्या कचरा निर्मूलन करण्यासाठी प्रत्येक घरात एक कचरा पेटी (डस्टबिन) देण्यात आली.
याची सुरूवात वार्ड क्रमांक 1 मधून ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गोपाळ पाटील, राकेश धामणेकर, वैजनाथ बेन्नाळकर व सदस्या मधु पाटील यांच्या हस्ते नागरिकांना कचरा पेटीचे (डस्टबिन) वाटप करण्यात आले.
तो कचरा गावामध्ये येणार्‍या कचरा गाडीतच टाकावा असे आवाहन करण्यात आले. तसेच मोकळ्या जागेत कचरा टाकणार्‍यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच 1000 रू. दंड वसूल करण्यात येईल. आजवर ग्रामपंचायतने कचरा टाकणार्‍यांच्याकडून जवळपास 30000 रू. दंड वसूल केला आहे.
कचरा टाकणार्‍या व्यक्तीचे नाव ग्रामपंचायतीत कळविल्यास, माहिती देणार्‍याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गोपाळ पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेनकनहळ्ळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेत ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे रोपे पुनर्लावणी उपक्रम

Spread the love  गेल्या वर्षी लावलेली ५६० रोपांची जोमदार वाढ पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *