
बेळगाव : प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तिसरे रेल्वे गेट ओव्हर ब्रिजच्या रस्त्याची आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली. तसेच रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित अभियंत्यांना दिल्या.
ब्रिजच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे मागील ब्रिजच्या काँक्रीटवरील सर्व डांबरीकरण उखडून ठिकठिकाणी खडी पडली आहे. ब्रिजवरील रस्ता अनेक ठिकाणी खचला असून बरेच जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वारंवार लहान-मोठे अपघात घडत आहेत.
या समस्येची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज गुरुवारी सकाळी स्वतः ब्रिजवरील रस्त्याची संपूर्ण पाहणी करत अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta