बेळगाव : भारतीय संरक्षण सेवेतील निवृत्त कर्मचारी सूर्यकांत देवरमनी यांना स्वीडनमधील गोटेनबर्ग येथे होणाऱ्या प्रतिष्ठित जागतिक मास्टर्स ऍथलेटिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. निवृत्त भारतीय संरक्षण सेवेतील कर्मचारी सूर्यकांत देवरमणी हे 72 वर्षांचे ज्येष्ठ खेळाडू असून त्यांची गोटेनबर्ग, स्वीडन येथे होणाऱ्या प्रतिष्ठित जागतिक मास्टर्स ऍथलेटिक चॅम्पियनशिपसाठी भारतातून निवड झाली आहे. सदर चॅम्पियनशिप 13 ते 25 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. चन्नम्मा नगरमध्ये किराणा दुकान चालवणाऱ्या या ज्येष्ठ खेळाडूला क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निधीची कमतरता भासत आहे. चॅम्पियनशिपमध्ये देवरमणी 10 किमी धावणे, 5 किमी धावणे आणि चालणे आदी स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत. आपल्या शानदार कारकिर्दीत, त्यांनी आपल्या महाविद्यालयीन दिवसांपासून 400 हून अधिक पदके आणि ट्रॉफी पटकाविल्या आहेत. देवरमणी यांनी नेपाळ, श्रीलंका आणि दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन देशाचा गौरव केला आहे. देशभरात चंदीगड, दिल्ली, पुणे, बंगळुरू, मुंबई, हैदराबाद इ.सह देशभरात झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आहे. आतापर्यंत पेन्शन आणि इतर कमाईच्या माध्यमातून त्यांनी खर्च झेलला आहे. मात्र स्वीडन येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निधीची कमतरता आहे. या खेळाडूला या आधी फेसबुक फ्रेंड सर्कलने सहकार्य केले आहे. याचप्रमाणे समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. 11 ऑगस्टला बेंगळुरूहून विमानमार्गे ते प्रवास करणार असून १० ऑगस्ट रोजी ते बेळगावहून निघणार आहेत. तरी त्यांच्या या स्पर्धेसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घयावा असे आवाहन करण्यात येत आहे.