Sunday , September 20 2026
Breaking News

सुट्ट्या भरून काढण्यासाठी आता शनिवारी भरणार पूर्ण दिवस शाळा

Spread the love

 

बेळगाव : अतिवृष्टीमुळे गेल्या 22 ते 27 जुलै 2024 या कालावधीत बेळगाव शहरासह जिल्ह्यातील सरकारी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

सदर सहा दिवसांची सुट्टी संबंधित सर्व शाळांनी येत्या दि. 10 ऑगस्ट ते दि. 21 सप्टेंबर 2024 या कालावधीत दर शनिवारी भरून काढावी, असा आदेश शिक्षण खात्याने बजावला आहे. शिक्षण खात्याच्या या आदेशानुसार आता येत्या दि. 10, 17, 24 आणि 31 ऑगस्ट, त्याचप्रमाणे 14 व 21 सप्टेंबर 2024 अशा शनिवारच्या दिवशी बेळगाव शहरासह जिल्ह्यातील सरकारी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू राहणार आहेत. या शनिवारच्या दिवशी शाळेची वेळ सकाळी 9:45 ते सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत अशी असणार आहे. शिक्षण खात्याने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *