चंदगड : इचलकरंजी येथे झालेल्या बैठकीत दैनिक महान कार्य चंदगड तालुका प्रतिनिधी कार्यरत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन संजय इरकल मुंबईचे पोलिस क्राईम डायरीचे सर्वेसर्वा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पांडूरंग पोवार शिरगांव ता. राधानगरी व बेळगांव जिल्हा अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे यांच्या हस्ते प्रकाश ऐनापूरे यांना चंदगड तालुका प्रमुख पदी निवडीचे पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पांडूरंग पोवार यांनी केले. सुत्रसंचालन रजनी शिंदे यांनी केले. निवड झालेल्या जिल्हा अध्यक्ष पांडूरंग पोवार, बेळगांव जिल्हा अध्यक्ष विक्रम शिंगाडे व संपादक पोलिस ऑफ इंडियाचे युवराज मोरे, महिला राज्य अध्यक्षा रजनी शिंदे, हातकणंगले ता. प्रमुख अन्वर मुल्ला, राधानगरी ता. प्रमुख सुभाष चौगुले यांचा ही पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकार अशोक पाटील, दताजीराव बरड, विनायक संकपाळ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.