बेळगाव : कोलकात्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला पदव्युत्तर प्रशिक्षण (पीजीटी) डॉक्टरच्या लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज बेळगावात डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी एक भव्य निषेध रॅली काढली.
कोलकाता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर केवळ बलात्कारच नाही तर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. क्रूर राक्षसी वर्तन करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. डॉक्टरांना जोवर सुरक्षा दिली जाणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. कोलकाता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि पुरावेही नष्ट करण्यात आले. अशावेळी कोणीही मदतीला धावून येत नाही. हे दुर्दैवी आहे. देशात डॉक्टरांना सुरक्षा नसेल तर सर्वसामान्य महिलांना सुरक्षा मिळणार कुठून? असा सवाल नवज्योती चरण यांनी व्यक्त केला. डॉक्टर सुरक्षित नाहीत. अनेक ठिकाणी हल्ले आणि बलात्काराच्या घटना घडत आहेत. कोलकाता प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे ही चांगली गोष्ट आहे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे असा आग्रह आणखी एका आंदोलकाने केला.
यासंदर्भात बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यामार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले. या निषेध रॅलीत विविध डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta
माझं तर मन करतय आशा ,निर्भयांना न्याय देण्यासाठि आणि भविष्यातील आशा घचनांना रोखन्यासाठी चला सर्वांनीच रस्त्यावरील उतरूया आणि त्या नरधमांना जनतेच्या न्यायालयात ताबडतोब शिक्षा देवूया.
खरच जीवाची लाही होते.
आज या घटनेच्या शोकात राष्ट्रीय शोक मनवूया, ‘तिरंगा’ आर्ध्या वर लटकूया आसच वाटत आहे.
काय मायबाप हो कसकाय धीरधरायच हो।।।।।