Sunday , July 26 2026
Breaking News

कपडे धुण्यासाठी धरणावर गेलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : कपडे धुण्यासाठी धरणावर गेलेल्या महिलेचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास खादरवाडी येथे घडली आहे. मृत्यू झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव सुनीता सोमनाथ पाटील (वय ५०) असे असून या महिलेच्या पश्चात पती, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, सदर महिला कपडे धुण्यासाठी धरणावर गेली होती. बराच वेळ उलटल्यानंतर धरणाच्या बाजूला जनावरे चारणाऱ्या मुलांनी सदर महिलेचा मृतदेह पाहिला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धरणाकडे धाव घेतली आणि घटनेची माहिती तातडीने बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाला कळविली.

तातडीने ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *