Tuesday , March 3 2026
Breaking News

आमदार – खासदारांच्या नावाचा गैरवापर करून पोलीस अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्याला अटक

Spread the love

 

बेळगाव : बेळगावच्या एसपी आणि आयजीपींना वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून त्यांचे म्हणणे न ऐकल्यास बदली करण्याची धमकी देणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

बेळगावचे एसपी भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती देताना सांगितले की, मी गोकाकचे आमदार बोलतोय, मी जिल्हा पालक मंत्री बोलतोय, मी बेळगावचे खासदार बोलतोय. असे फोनवरून एसपी भीमशंकर गुळेद यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे न ऐकल्यास बदली करू, अशी धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
मूळचा अरभावी येथील असलेला सुनील दासर याने बेळगावातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना धमकावल्याचे प्रकरण समोर आले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या या व्यक्तीने हे कृत्य केले. त्याच्या काही नातेवाईकांनी या व्यक्तीच्या आई आणि त्याच्याविरोधात तक्रार केल्याने खटल्यातून सुटण्यासाठी त्याने बेळगावचे लोकप्रतिनिधी असल्याचे भासवले. गोकाक आणि बेळगाव पोलिसांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला असता त्याने हल्ला केला. या बनावट आमदार/खासदाराला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आणि पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *