Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगाव येथील श्री रुद्र केसरी मठात श्री सिद्धारू महाराज पुण्यतिथी साजरी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव लक्ष्मीटेक जवळील सैनिक नगर येथील श्री रुद्र केसरी मठात आज मंगळवार रोजी श्री सिद्धारूढ महाराज पुण्यतिथी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. आज पहाटेपासूनच श्री सिद्धारूढ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त रुद्र केशरी मठात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परमपूज्य हरि गुरु महाराजांच्या सानिध्यात पहाटे श्रीमूर्तीला अभिषेक व रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली. भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी एक वाजता आली. श्री सिद्धारूढ महाराज मठात स्वामी हरि गुरु महाराज यांच्या यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ झाला. यावेळी स्वामी हरि गुरु महाराज यांनी भाविकांना महाप्रसादाचे महत्त्व पटवून दिले. तसेच आपल्या प्रवचनातून संपूर्ण अद्वैत सार सांगितला. सायंकाळी आरतीने उत्सवाची सांगता झाली. यावेळी हजारो भक्तगण उपस्थित होते. जगद्गुरु श्री सिद्धारूढ स्वामींची आज 95 पुण्यतिथी आहे. श्री सिद्धारूढ स्वामी आपल्या वयाच्या 40 व्या वर्षी हुबळी येथे स्थायिक झाले व आपल्या भक्तांना हुबळी येथील मठात दैवी वाणीतून अद्वैत वेदांताचा बोध दिला. “शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे” हे शास्त्र त्यांनी ग्रंथातील तत्त्वज्ञान स्वतःच्या जीवनाद्वारे प्रकट केले कलियुगातील कल्पतरू योगीराज जगद्गुरु श्री सिद्धारूढ स्वामी आपल्या वयाच्या 93 व्या वर्षी पवित्र श्रावण मासा मध्ये देह त्याग केला देह त्या केल्यानंतरही याच तागायत सद्गुरु प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या राहून अनेकांचा उद्धार करत आहेत अशी भाविकांची भावना आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *